esakal | कोरोनामुळे यंदाही होळीचा रंग बेरंग; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प; प्रशासनाचे कडक निर्बंध
sakal

बोलून बातमी शोधा

No business and excitement of Holi due to corona virus tis year

दरवर्षी होळी तसेच धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात जिल्हाभर साजरा केला जातो. गेल्या वर्षी कोरोनाने घातलेला धुमाक़ूळ यावर्षी सुरूच आहे. दिवसाला चारशेच्यावर रुग्ण निघत आहे.

कोरोनामुळे यंदाही होळीचा रंग बेरंग; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प; प्रशासनाचे कडक निर्बंध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : होळी तसेच धूलिवंदन सणावर यंदा कोरोनाचे सावट आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सण साजरे करण्यास निर्बंध आणले आहेत. कोरोनामुळे रंग, गुलालाचे होणारे व्यवहार ठप्प झाल्याने कोट्यवधींचा फटका बसला आहे. दरवर्षी रंगाचा व्यवसाय करणारे यावर्षी अडचणीत सापडले आहेत.

दरवर्षी होळी तसेच धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात जिल्हाभर साजरा केला जातो. गेल्या वर्षी कोरोनाने घातलेला धुमाक़ूळ यावर्षी सुरूच आहे. दिवसाला चारशेच्यावर रुग्ण निघत आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. यंदाही होळीवर कोरोनाचे सावट आहे. शासनाने होळी तसेच धूलिवंदन साजरे करण्यावर निर्बंध आणले आहेत. परिणामी, शहरातील होळीच्या साहित्याची विक्री करणारे ठोक व्यावसायिकांची उलाढाल ठप्प झाली आहे.

ब्रेकिंग : गडचिरोलीच्या खोब्रामेंढा जंगलात पाच माओवाद्यांना कंठस्नान; मृतांमध्ये ३...

होळीच्या एक महिन्यांपूर्वीपासून फुटाणा गल्लीत किरकोळ विक्रेत्यांच्या गर्दीमुळे पाय ठेवायला जागा नसते. या काळात प्रत्येक विक्रेता लाखो रुपयांचा व्यवसाय करतो. यंदा चित्र उलट आहे. ठोक दुकानदार एक-एका ग्राहकांची प्रतीक्षा करतोय. शहरात पुणे, नागपूर, अमरावती येथून गुलाल, रंग आदी साहित्य उपलब्ध झाले आहे. यात टोपी, पिचकारी, भोंगे आदी दिल्ली भागातून येतात. विशेषत: फॅन्सी पिचकाऱ्यांचा यात समावेश असतो. कोरानामुळे ठोक व्यावसायिकांनी कुठल्याच प्रकारचा नवीन माल मागवला नाही. मागील वर्षीच्या शिल्लक मालाची विक्री करून मिळेल ते उत्पन्न प्राप्त करण्यावर त्यांचा भर आहे.

जुन्या मालावरच व्यवसाय

कोरोनाने सर्वच ठोक विक्रेत्यांनी नवीन मालाची खरेदी केलेली नाही. कधी काय घोषणा होईल, सांगता येत नाही. त्यामुळे मागील वर्षीचा शिल्लक माल विक्रीसाठी ठेवला आहे. दरवर्षी होळीला चायनीज पिचकारी, बलूनची धूम असते. मात्र, गत वर्षीपासून दुकानातील चायनीज मालालाही उठाव नसल्याचे ठोक विक्रेते सांगतात.

सावधान! एप्रिल-मे महिन्यात सर्वाधिक उष्ण लहरी; नागपूर...

दोन पिढ्यांपासून होळीच्या रंगाचा व्यवसाय करतो. मात्र, असे दिवस कधी पाहिले नाहीत. मार्चमध्ये दोन वेळा जेवायला वेळ मिळत नसे. रात्रीपर्यंत किरकोळ विक्रेत्यांची दुकानात गर्दी असायची. मात्र, यावर्षी दिवसभरात एक-दोन ग्राहक येतात. त्यातही दरवर्षीच्या तुलनेत ते पाच टक्‍केही माल खरेदी करीत नाही.
-दयालाल प्रेमजी, 
ठोक विक्रेता. यवतमाळ

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image