
यवतमाळ : आदिवासी विकास विभागाच्या निधीविषयक अपप्रचार केला जात आहे. वास्तविक या आर्थिक वर्षांत आदिवासी विभागाला २१ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी दिली. अपप्रचाराला पूर्ण विराम देण्याचे आवाहन त्यांनी केले.