
मोवाड : ग्रामीण भागातील मुलांचे लग्न जुळता जुळत नसल्याने, संपूर्ण तालुक्यातील विवाह योग्य मुलांची संख्या वाढली आहे. याचे मुख्य कारण शोधल्यास, लग्नायोग्य मुलींना नौकरीवाला किंवा शहरातील मुलगा हवा आहे. सध्या परिस्थितीत बघता ‘शेतकरी नवरा नको गं बाई’असा सुर यांचा दिसतो आहे. ग्रामीण भागातील मुलांची लग्न न जुळण्याचे एकमेव कारण दिसत आहे.