
खामगाव : जळगाव जामोद येथील पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाचा पोलिसांचा तपास शेवटच्या टप्प्यात आला असून यामध्ये कोणताही घातपात झाल्याचे निष्पन्न होत नाही. तरी सुद्धा काही शंका असतील त्यादृष्टीने आम्ही बारकाईने तपास करीत असून लवकरच या प्रकरणाचा फायनल रिपोर्ट सादर केला जाईल अशी माहिती एएसपी श्रेणीक लोढा यांनी दिली आहे.