"इनकमिंग'मुळे जुन्यांवर अन्याय नाही : खासदार सहस्रबुद्धे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागपूर : भाजप लिमिटेड कंपनी नाही. पक्ष अधिक आकर्षक झाल्याने नवीन कार्यकर्ते येणे स्वाभाविकच आहे. कुणाच्या आल्याने भाजपच्या मूळ प्रवृत्तीत बदल झाला नाही. इनकमिंगमुळे जुन्यावर अन्यायही होणार नसल्याचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

निवडणुकीचा बिगुल वाजला नसला तरी प्रचार सुरू झाला आहे. महायुतीचा विजय निश्‍चित असला तरी आम्ही आव्हान मानूनच निवडणुकीला सामोरे जात आहोत. भाजप-शिवसेनेची युती निश्‍चितपणे होईल. देशाची अस्मिता आहे तशी राज्याची, गावांची आणि छोट्या-छोट्या गल्ली बोळांचीही असते. छोट्या अस्मिता पूर्वापार जपत राजकारण केले आहे. शिवसेनेचा जन्म होण्यापूर्वीपासून आम्ही प्रादेशिक अस्मितांची जपवणूक करीत वाटचाल करीत असल्याचे ते म्हणाले.
लोकप्रिय नाही लोकहिताचे बोलू आणि ते करून दाखवू, ही आमची भूमिका आहे. आणीबाणीनंतर आजवर कुटुंब नियोजनावर बोलणेच टाळले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र हा विषय हाताळत छोट्या कुटुंबाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no injustice because of "incoming"