
अकोला ः बाळ जन्माला आले घरभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ही गोड बातमी बाळाच्या बापाला सांगितलीही. आज उद्या काम अटोपून येतोच म्हणणाऱ्या बापाला लॉकडाउनमुळे अडकून रहावे लागले. आज दीड महिन्यापासून जन्मलेल्या बाळाचा चेहराही पाहता आला नाही. ही झाली एकाची तर एका पोलिस कर्मचाऱ्यांचे वडील हयात नाहीत. गावाकडे आईच शेती सांभाळते. गावी जाऊन आईला भेटावं वाटते मात्र, लॉकडाउनमध्ये आधी कर्तव्य नंतरच परिवार. अशा एक नाही तर अनेक भावनिक घालमेली ऱ्हदयी साठवून सध्या पोलिस कर्मचारी लॉकडाउनमध्ये कर्तव्य पार पाडत आहेत.
कोरोना फायटर्स म्हणून फ्रंट लाईनला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आरोग्य आणि पोलिस विभाग कार्यरत आहे. अशातच 22 मार्चपासून जनता कर्फ्यू झाल्यानंतर देशभर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पोलिसांच्या कामाचे ओझेही तेवढेच वाढले आहे. मात्र, या लॉकडाउनमुळे जशी सर्वसामान्यांची कोंडी झाली अगदी त्याच प्रकारे पोलिसांचीही कोंडी झाली आहे. कारण, पोलिसही माणुस आहे. त्यालाही परिवार आहे. घरोघरी येणाऱ्या अडीअडचणीही पोलिसांच्या घरी येतात. या सर्व अडचणींना तोंड देत सध्या पोलिस कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहेत.
स्वतःला जपून कर्तव्य पार पाड
लॉकडाउनच्या दरम्यान कर्तव्यावर असताना कधी आॅडीओ तर कधी व्हिडिओ कॉल करून कुटुंबीयांशी संवाद साधल्या जातो. आपुलकीने विचारपूस नंतर सोशल डिस्टन्स, घराबाहेर पडून नका, नियमीत हात धुवा यासह अनेक सुचना आपसूक केल्या जातात. तर तिकडून आई-वडील बाळा स्वतःल जपून कर्तव्य पार पाड असे सांगताना आपसूकच डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.
कधी-कधी घरीही जावे वाटत नाही
लॉकडाउन काळात दिवसभर रस्त्यावर उभे राहावे लागते. काहींना तर प्रतिबंधित क्षेत्रातही कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रयत्न करावे लागतात. ड्यूटी संपल्यानंतर घरी जाण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा घरीही जावे वाटत नाही. असेही अनेक पोलिस कर्मचारी सांगतात. जेणे करून आपल्यामुळे आपला परिवार अडचणीत येईल तेव्हा घराकडे पडणारे पावलं कधी-कधी थबकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.