अमरावती - खरीप हंगामातील तूरीची हमीदराने शासकीय खरेदी करण्यात येणार आहे. त्यापुर्वी सोयाबीनची खरेदी झाली असून खरेदी झालेला सोयाबीन व जुना शेतमाल यामुले वखार महामंडळाच्या गोदामांत तूर साठविण्याकरीता जागा शिल्लक नाही. त्यासाठी भाडेतत्वावर खासगी गोदाम वखार महामंडळाने घेतली असून अमरावती विभागांत ६५ खासगी गोदाम भाड्याने घेण्यात आली आहेत. मात्र खरेदीच नसल्याने गोदाम तशीच पडून आहेत.