वार्षिक अहवालासाठी वेळेत माहितीच येईना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत वार्षिक अहवालाला मंजुरी दिली जाते. विद्यापीठातील सर्वच विभागांसह त्यांचे उपक्रम आणि महाविद्यालयांच्या माहितीचा समावेश करण्यात येतो. बैठकीच्या महिन्याभरापूर्वी सदस्यांना हा अहवाल मिळावा यासाठी विद्यापीठाचा विकास विभाग प्रयत्नरत असताना, संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठातील इतर विभाग वेळेत माहिती देत नसल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षी सिनेट बैठकीत सदस्यांनी वार्षिक अहवालातील काही चुका समोर आणून अहवालात अपडेट माहिती असावी, असा आक्षेप घेतला. हा अहवाल सरकारलाही सादर केला जात असतो. त्यामुळे त्यामधील त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने सदस्यांना एक महिना अगोदर वार्षिक अहवाल वाचण्यासाठी मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी मान्य करीत, व्यवस्थापन परिषदेने सदस्यांना एका महिन्यापूर्वी अहवाल देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यानुसार वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी विकास विभागाकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. अहवालात विद्यापीठातील सर्वच विभागांसह त्यांचे उपक्रम आणि महाविद्यालयांच्या माहितीचा समावेश करण्यात येतो. ही माहिती मागविण्यासाठी विभाग आणि महाविद्यालयांना पत्र देण्यात आले. मात्र, विद्यापीठातील काही विभागांकडून माहिती मिळत नसल्याची माहिती आहे. याशिवाय महाविद्यालयांकडूनही माहिती वेळत उपलब्ध होत नसल्याने वार्षिक अहवाल वेळेत करायचा कसा, हे आव्हान विभागासमोर आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No timely information was available for the annual report