माहिती सादर न करणाऱ्या उमेदवारांना आता नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

अमरावती : लेखाविषयक खर्च सादर न करणाऱ्या व अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना नोटिस देण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी विविध मतदारसंघांच्या तपासणीदरम्यान दिले. 
श्री. बंडी यांनी शुक्रवारी अमरावती निवडणूक कार्यालय, बडनेरा मतदारसंघाचे भातकुली तहसीलस्थित कार्यालय व धामणगावरेल्वे मतदारसंघाच्या चांदूर रेल्वे येथील कार्यालयात निवडणूक खर्चाची तपासणी केली व आढळून आलेल्या त्रुटींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

सर्व उमेदवारांनी आपापल्या खर्चाचे लेखे तपासणीसाठी वेळेत सादर करणे आवश्‍यक आहे. लेखे सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील बाब क्रमांक 77 मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे माहिती सादर न केल्यास निवडणूक आयोगाला कळविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. 
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची पुढील तपासणी 15 व 19 ऑक्‍टोबरला होणार आहे. निवडणूक खर्च निरीक्षक बंडी हे यावेळी विविध ठिकाणी भेट देऊन तपासणी करणार आहेत. यावेळी सर्व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हजर राहावे, तसेच नागरिकांनाही यावेळी उपस्थित राहता येईल, असे सांगण्यात आले. यावेळी मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी, उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice now to candidates who do not submit information