
यवतमाळ : राज्य शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात १०९८ हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकाचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे मुलांमध्ये लहान वयातच स्वतःच्या हक्काविषयी जागरूकता, संकटात मदत घेण्याचा आत्मविश्वास आणि सुरक्षेची भावना रुजविण्याचा प्रयत्न होणार आहे.