esakal | वऱ्हाडींनो लग्नात जाताय? मग लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी आवश्‍यक
sakal

बोलून बातमी शोधा

वऱ्हाडींनो लग्नात जाताय? मग लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी आवश्‍यक

वऱ्हाडींनो लग्नात जाताय? मग लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी आवश्‍यक

sakal_logo
By
- टीम ई-सकाळ

यवतमाळ : लग्न समारंभास जास्तीत जास्त 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची परवानगी संबंधित तहसीलदार यांच्याकडून प्राप्त करून घेणे आवश्‍यक आहे. लग्नात उपस्थित राहणाऱ्या 25 व्यक्तींना (वधू/वरासह) शासनाच्या नियमानुसार व पात्रतेनुसार लसीकरण करणे आवश्‍यक आहे. किंवा आरटीपीसीआर चाचणीचा मागील 48 तासातील निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्‍यक राहील.

हेही वाचा: "मामा, अपने को कूछ नही होता बे"; हा Attutide ठेवा खिशात: एका कोरोनाग्रस्ताचं भावनिक पत्र

लग्न समारंभासाठी केवळ 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असताना मोठ्या प्रमाणात व्यक्ती उपस्थित राहतात किंवा टप्प्याटप्प्याने लग्नात उपस्थिती दर्शवितात, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत होत आहे.

लग्न समारंभामुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने लग्न समारंभाकरिता अटी घालून देण्यात आल्या आहेत. लग्न समारंभास फक्त 25 व्यक्तीच उपस्थित राहतील व टप्प्याटप्प्याने व्यक्तींना लग्न समारंभास बोलाविण्यात येऊ नये. अर्जदाराने केलेल्या अर्जानुसार त्यांना तीन तासाची परवानगी देय राहील.

हेही वाचा: वर्दळीच्या बाजारांमध्ये आता सम-विषम पॅटर्न; कोणत्या झोनमधील दुकानं कधी राहतील सुरु; जाणून घ्या

लग्न समारंभास उपस्थित राहणाऱ्या 25 व्यक्तींनी नियमानुसार व पात्रतेनुसार लसीकरण केलेले असणे आवश्‍यक आहे. किंवा आरटीपीसीआर चाचणीचा मागील 48 तासातील निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्‍यक आहे. वरील अटींचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image