esakal | काय सांगता! यासाठी चक्क शिक्षकांनी घातले लोटांगण; अध्यक्ष, उपाध्यक्षांकडे वाढल्या चकरा; कारण काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Now Teachers are wants to enter in Education Committee

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत नऊ जिल्हा परिषद सदस्य असतात. याशिवाय तीन शिक्षकांची समितीत निवड केली जाते. त्यात एक शिक्षणतज्ज्ञ, तर उर्वरित दोन शिक्षक मोठ्या संघटनेत कार्यरत असावे,

काय सांगता! यासाठी चक्क शिक्षकांनी घातले लोटांगण; अध्यक्ष, उपाध्यक्षांकडे वाढल्या चकरा; कारण काय?

sakal_logo
By
श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर:  विद्यार्थ्यांना स्वावलंबन, स्वाभिमानाचे धडे देण्याचे काम करणारे शिक्षकच आता शिक्षण समितीत समावेश करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांपुढेच लोटांगण घालत आहे. शिक्षण समितीत गेल्या काही वर्षांपासून रिक्त असलेल्या दोन शिक्षक प्रतिनिधींची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना सक्रिय झाल्या आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींच्या कक्षांकडे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या चकरा अलीकडे वाढल्या आहेत. 
   
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत नऊ जिल्हा परिषद सदस्य असतात. याशिवाय तीन शिक्षकांची समितीत निवड केली जाते. त्यात एक शिक्षणतज्ज्ञ, तर उर्वरित दोन शिक्षक मोठ्या संघटनेत कार्यरत असावे, असा निकष निवडीचा आहे. गेल्या काही वर्षांपासून शिक्षण समितीत एकच शिक्षणतज्ज्ञ आहे. उर्वरित दोन शिक्षकांची नियुक्ती विविध शिक्षक संघटनांच्या आपसी वादामुळे आजवर करण्यात आली नव्हती. 

महत्त्वाची बातमी - धक्कादायक! नातेवाईकांनी शेवटच्या क्षणी चेहरा दाखवण्याची केली मागणी; अन प्लॅस्टिक बाजूला करताच...

जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेत नवे पदाधिकारी आरूढ झाले. शिक्षण समितीत रिक्त असलेली दोन शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी लावून धरली होती. शिक्षक संघटनेच्या मागणीची दखल घेत पदाधिकाऱ्यांनी शिक्षण समितीतील रिक्त पदे भरण्याचे आश्‍वासन संघटनांना दिले होते. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया रखडली होती. आता शिक्षण समितीतील रिक्त दोन शिक्षकांची पदे भरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांपुढे लोटांगण घालणे सुरू केले आहे. 

अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींना गाठून शिक्षण समितीत आपल्या नावाची शिफारशी करावी, असा आग्रह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून धरला जात आहे. सध्यातरी पदाधिकारीही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना आश्‍वासन देऊन मोकळे होत आहेत. शिक्षण समितीत तीन शिक्षक असतात. त्यातील शिक्षणतज्ज्ञाचे पद भरले आहे. आता दोनच शिक्षक प्रतिनिधींची निवड करावयाची आहे. जिल्ह्यात अनेक शिक्षक संघटना आहे. विविध संघटनांचे आपसी वाद आहेत. याच वादातून एकाएका संघटनेतून अनेक नावांची शिफारस करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण समितीतील दोन शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रिया राबवावी तरी कशी, असा प्रश्‍न जिल्हा परिषदेसमोर पडला आहे. 

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

विरोधकांनाही संघटनांचे साकडे 

जिल्हा परिषदेतील विरोधी बाकावर बसलेल्या कॉंग्रेसच्या काही जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून शिक्षक संघटनांनी लॅबिंग सुरू केले आहे. आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीची समितीत निवड करावी, यासाठी आग्रह धरला जात आहे. येत्या काही दिवसांत शिक्षण समितीत रिक्त असलेल्या दोन शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ