अमरावती : NIA ची दुसरी चमू मुंबईला रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NIA team to mumbai Important documents seized

अमरावती : NIA ची दुसरी चमू मुंबईला रवाना

अमरावती : शहरातील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) दुसरी चमू आठवडाभराच्या झडतीनंतर शुक्रवारी मुंबईकडे रवाना झाली. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी या माहितीला दुजोरा दिला. अमरावती शहरात २१ जून रोजी न्यू हायस्कूल मेनच्या गल्लीत उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर वार करून खून झाला होता. हे प्रकरण गंभीर असल्याने त्याचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला होता. त्याआधी स्थानिक पोलिसांनी सात संशयित मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. १ जुलैला एनआयएची चमू शहरात पोचली होती.

दोन दिवस चौकशी करीत असताना त्यांनी याची कुणालाही कल्पना येऊ दिली नव्हती. गोपनीय पद्धतीने तपास सुरू होता. ६ जुलैला दुपारीच सातही आरोपींना घेऊन एक चमू मुंबईला रवाना झाली. याच पथकातील दुसरी चमू शहरातच तळ ठोकून होती. त्यांनी विविध भागातून माहिती घेतली तसेच काही ठिकाणी झडती घेतली. अधिकाऱ्यांनी दोन दिवसात आवश्यक लोकांचे बयाण नोंदवून, दस्तऐवज ताब्यात घेतले व आज ही चमू मुंबईला रवाना झाली.

अमरावती पोलिसांनी सातही संशयित मारेकऱ्यांना अटक करून एनआयएच्या ताब्यात दिले. तपासाच्या प्रत्येक टप्प्यात गोपनीयता कायम ठेवत प्रामाणिकपणे सहकार्य केले.

- डॉ. आरती सिंह, पोलिस आयुक्त.

Web Title: Nupur Sharma Controversy Umesh Kolhe Murder Case Nia Team To Mumbai Important Documents Seized

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..