esakal | भंगार रुग्णवाहिका मारली सावली ग्रामीण रुग्णालयाच्या माथी...सांगा, रुग्णांना कसे हलविणार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दोन वर्षांपूर्वी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका सावली ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली. रुग्णवाहिका जुनी असल्याने त्यात वारंवार बिघाड होत आहे. दोन-दोन महिने रुग्णवाहिका नादुरुस्त असते. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी रुग्णवाहिका शोधताना नातेवाईकांना बरीच कसरत करावी लागते.

भंगार रुग्णवाहिका मारली सावली ग्रामीण रुग्णालयाच्या माथी...सांगा, रुग्णांना कसे हलविणार

sakal_logo
By
सुधाकर दुधे

सावली (जि चंद्रपूर) : सावली शहर तालुक्‍याचे मुख्यालय आहे. तालुक्‍याच्या ठिकाणी एकमेव ग्रामीण रुग्णालयात आहे. या रुग्णालयात १०८ आणि १०२ या दोन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र या दोन्ही रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत. त्यामुळे रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविताना मोठ्या अडचणी निर्माण होतात. यात रुग्णवाहिका जुन्या असून भंगार झाल्या आहेत. दुसऱ्या रुग्णालयातून त्या सावली रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी पाठविण्यात आल्या होत्या.

१०२ ही रुग्णवाहिका मागील दोन; तर १०८ ही रुग्णवाहिका पंधरा दिवसांपासून नादुरुस्त आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे साथीच्या आजाराचे रुग्णही मोठ्या संख्येत सापडत आहेत. साथजन्य आजाराच्या रुग्णांची रांग ग्रामीण रुग्णालयात लागलेली असते. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलविता यावे, यासाठी रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली.

नातेवाईकांना शोधावी लागते रुग्णवाहिका

दोन वर्षांपूर्वी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका सावली ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली. रुग्णवाहिका जुनी असल्याने त्यात वारंवार बिघाड होत आहे. दोन-दोन महिने रुग्णवाहिका नादुरुस्त असते. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी रुग्णवाहिका शोधताना नातेवाईकांना बरीच कसरत करावी लागते. नादुरुस्त रुग्णवाहिकांना त्वरित दुरुस्त कराव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


हेही वाचा : कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ!आणीबाणीची स्थिती टाळण्यासाठी धावले पोलिस


दोन दिवसांत दुरुस्ती करणार
ग्रामीण रुग्णालयातील १०८ आणि १०२ या दोन्ही रुग्णवाहिका बिघडल्यामुळे रुग्णांना दुसऱ्या वाहनाची सोय केली आहे. दोन दिवसांत दोन्ही रुग्णवाहिका दुरुस्त करण्यात येणार आहेत.
- भीमराव धुर्वे
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक
ग्रामीण रुग्णालय सावली.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image
go to top