Amravati News: अमरावतीत जुनी इमारत कोसळली! मलब्याखाली चार जण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

old building in main market collapsed in Amravati four people feared trapped under debris

Amravati News: अमरावतीत जुनी इमारत कोसळली! मलब्याखाली चार जण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

अमरावती: शहरातील मुख्य बाजारातील इमारत कोसळल्याची घटना समोर आली असून मलब्याखाली चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ढिगाऱ्यातून एक जणाला सुरक्षित बाहेर काढण्यात यंत्रणाना यश आले आहे. दरम्यान या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे.

मुख्य बाजारातील प्रभास टॉकिज च्या बाजूला असलेली जुनी दोन मजली इमारत महानगरपालिकेने सात वेळा नोटीसा दिल्या होत्या, त्यानंतर मालकाने वरचा मजला हटवला होता. मात्र खालच्या मजल्यावर सिलींगचे काम सुरू असताना ही इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. खाली बॅग हाऊस असे दुकान होते त्यामुळे त्या दुकानाचा मालक आणि ग्राहक मलब्याखाली दबल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला पाच जण दबल्याचे सांगण्यात आले होते पण एक जणाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा: Kangana Ranaut: 'कंगनाचे पक्षात स्वागत, पण...'; लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्याबाबत नड्डा स्पष्टच बोलले