
वर्धा - महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि साधेपणाच्या विचारांची शिकवण आजही सेवाग्राम येथील ऐतिहासिक आश्रमातून जगभर दिली जात आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी तब्बल ९९४ पर्यटकांनी बापू कुटीला भेट दिली. गांधी विचारांच्या प्रेरणादायी वाटचालीचा अनुभव घेण्याच्या या प्रयत्नातून गांधी तत्त्वज्ञानाबद्दलची उत्सुकता आणि जाणीव अधिक दृढ झाली आहे.