esakal | बापरे! सात लाखांच्या दरोड्याचा छडा लावतानाच पोलिसांनी जप्त केले २ किलो ८०० ग्रॅम सोन
sakal

बोलून बातमी शोधा

One crore jewelery seized from interstate thieves Chandrapur crime news

चौकशीत उत्तरप्रदेशातील ककराला गॅंगने ही कारवाई केली असून, राजू वरभे यांच्या मालकीचे वाहन वापरल्याचे सांगितले. मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात दाखल झाले. मुख्य आरोपी नवाबउल हसन हा त्याचा साथीदार दानवीर उर्फ गॅसटू याला भेटण्यासाठी हसनपूर येथे जात असल्याची माहिती मिळाली.

बापरे! सात लाखांच्या दरोड्याचा छडा लावतानाच पोलिसांनी जप्त केले २ किलो ८०० ग्रॅम सोन

sakal_logo
By
साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : गॅस कटरने बॅंक तिजोरी, एटीएम फोडून दागिने, रोख रक्कम लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी उत्तरप्रदेशातून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाबउल हसन, दानवीर उर्फ गॅसटू (रा. हसनपूर) अशी अटकेतील अट्टल चोरट्यांची नावे आहेत.

वरोरा तालुक्‍यातील टेमुर्डा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र येथे गॅस कटरने खिडकी तोडून चोरी करण्यात आली. या घटनेत चोरट्यांनी रोख सहा लाख ८८ हजार  १३० रुपये आणि ११ लाख ३५ हजार १० रुपये किमतीचे ९३.१०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याप्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले.

जाणून घ्या -  ‘शिवकुमार’ची विष घेऊन आत्महत्या; जाचाला कंटाळून विषारी पदार्थ सेवन केल्याचा पत्नीचा आरोप

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात प्रत्येकी दहा कर्मचाऱ्यांची दोन पथके गठित केली. तपासात चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेरे काढून फेकले. डीवीआरएस, अलार्मचे कनेक्‍शन तोडले, वीजपुरवठा करणारे केबल तोडले. तिजोरी कापण्यासाठी वापरण्यात आलेले ऑक्‍सिजन सिलिंडर शेतात लपवून ठेवल्याचे आढळून आले.

यानंतर सायबर सेलच्या माध्यमातून तांत्रिक माहिती घेतली. त्यात २०१३ मध्ये माढेळी येथे अशीच घटना घडल्याचे समोर आहे. याप्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक केली होती. तसेच मागील महिनाभरात भंडारा, गोंदिया आणि तेलंगणा राज्यात अशाच प्रकारचे गुन्हे घडले असून, उत्तरप्रदेशातील बदायू जिल्ह्यातील ककराला येथील काही चोरट्यांनी महाराष्ट्रातील काही गुन्हेगारांच्या मदतीने या कारवाया गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील गिरोला हेटी येथील देविदास रूपचंद कापगते, राजू वसंत वरभे, संकेत तेजराम उके यांना पडोली येथून ताब्यात घेतले.

चौकशीत उत्तरप्रदेशातील ककराला गॅंगने ही कारवाई केली असून, राजू वरभे यांच्या मालकीचे वाहन वापरल्याचे सांगितले. मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात दाखल झाले. मुख्य आरोपी नवाबउल हसन हा त्याचा साथीदार दानवीर उर्फ गॅसटू याला भेटण्यासाठी हसनपूर येथे जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. या दोघांनी टेमुर्डा येथील दरोडा हा उत्तरप्रदेशातील सहा, चंद्रपूर जिल्ह्यातील २, गोंदिया जिल्ह्यातील १ अशा ९ आरोपींनी मिळून केल्याची कबुली दिली. नवाबुल हसन याच्या घरातून पोलिसांनी २ किलो ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले.

अधिक माहितीसाठी - रणजित सफेलकरची पोलिसांनी काढली धिंड; अनवाणी पायाने, बरमुड्यावरच नेले न्यायालयात

अकरा गुन्ह्यांची दिली कबुली

गॅस कटरने बॅंकेची तिजोरी, एटीएम फोडणाऱ्या ककराला गॅंगने वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि राज्यात तब्बल ११ गुन्हे केले आहेत. यात भंडारा जिल्हा ५, गोंदिया ३, तेलंगणा १ आणि टेमुर्डा येथे २ गुन्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील अन्य गुन्ह्यांबाबत पोलिस तपास करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जप्त केलेला मुद्देमाल

ककराला गॅंगचा मुख्य सूत्रधार नवाबउल हसन याच्या घरून एक कोटी एक लाख दहा हजार रुपये किमतीचे दोन किलो ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने, पाच लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन, ऑक्‍सिजन सिलिंडर, ऍसिटिलीन सिलिंडर २५ हजार, डीवीआरएस मशीन पाच हजार, सोन्याचे वजन मोजणारी मशीन १० हजार, बेन्टेक्‍स ज्वेलरी ५ हजार, गॅस पाइप, गॅस कटर टॉर्च, ऑक्‍सिजन पाइप, ऑक्‍सिजन रेग्युलेटर, सीएनजी गॅस रेग्युलेटर ९ हजार ३००, कटर मशीन ३० हजार, चांदीचे भांडे २० हजार व अन्य २० हजार रुपयांचे साहित्य असा एकूण एक कोटी ७ लाख ३४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

loading image