Road Accident : मूर्तीजापूर-दर्यापूर रोडवर दोन कारचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तर पाचजण जखमी
Accident News : दर्यापूरजवळील मूर्तीजापूर रोडवर दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी नायरा पेट्रोल पंपासमोर घडली.
दर्यापूर : मूर्तीजापूर-दर्यापूर रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर दोन कारची समोरासमोर जबर धडक लागून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर पाचजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (ता.१५) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.