दुर्दैवी! सासऱ्याच्या तेरवीच्या दिवशी जावयाचा अपघाती मृत्यू; नादुरुस्त रस्त्याने घेतला बळी

प्रदीप बहुरुपी
Monday, 30 November 2020

वरुड (जि. अमरावती) : सासऱ्याची तेरवी करून गावाकडे परत जाणाऱ्या जावयाचा अपघातात मृत्यू झाला. शनिवारी रात्री वरुड-मोर्शी महामार्गावरील माणिकपूर फाट्यानजीक ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर कोकाटे (५२, रा. पुसला) यांचे सासरे मंगल मरकाम (रा. बारगाव) यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. शनिवारी बारगाव येथे सांसऱ्यांची तेरावी होती. कोकाटे परिवारासह बारगावात मुक्कामी होते.

अधिक वाचा - पोलिसांनी चक्क शेतकर्‍यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव

तेरवीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री कोकाटे गावी पुसला येथे जाण्यास निघाले. त्यापूर्वी, त्यांनी पत्नी व मुलास सोबत चालण्याचा आग्रह केला होता. परंतु, पत्नीने रात्री गावी येण्यास नकार दिला. त्यामुळे ते एकटेच पुसलाकडे जाण्यास निघाले.

बेनोडा ते माणिकपूर फाट्यादरम्यान रस्ता खराब झाल्याने दुरुस्तीसाठी खोदकाम केले आहे.  समोरून आलेल्या वाहनाच्या लाईटमुळे दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाला. रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यात रामेश्वर हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बेनोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान रामेश्वर यांचा मृत्यू झाला.

क्लिक करा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला होता तेथे कुठेही संबंधित बांधकाम कंत्राटदाराच्या वतीने रेडियम लावण्यात आले नव्हते. त्यामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. सासऱ्याच्या तेरवीच्या दिवशी जावयाचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबीयांत शोककळा पसरली आहे. याप्रकरणी  बेनोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One died on a faulty road in Warud taluka of Amravati district