
गोंदिया : २९ नोव्हेंबरचा तो दिवस... त्या शिवशाही बसमधील प्रवाशांसाठी काळ बनला... समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव शिवशाही उलटली... अन् ११ प्रवाशांचा जीव गेला... २९ प्रवासी जखमी झाले... या घटनेने जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्र हादरून गेला... आज २९ डिसेंबर या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे... अजूनही या अपघाताच्या आठवणी अंगावर शहारे आणत आहेत.