एकाचा रात्री तीन घरे फोडली, चोरट्यांनी घराच्या लोकांना बेशुद्ध केले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर)  : नागपूर शहरालगतच्या सोनेगाव (निपाणी) येथे चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका चोरीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य बाहेर आणून ठेवल्याने चोरट्यांनी घराच्या लोकांना बेशुद्ध केले असावे असा तर्क लावला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोनेगावचे (निपाणी) ग्रा.पं. सदस्य व कॉंग्रेसचे पदाधिकारी विनोद लंगोटे रात्री एक वाजता झोपी गेले. मध्यरात्री 3.30 सुमारास त्यांची आई जागी झाली तेव्हा त्यांना मुख्य दरवाजा तुटलेला दिसला. त्यांनी मुलगा विनोद यास जागे केले. कपाट तुटले होते. बॅंकेतून आणलेले एक लाख 70 हजार रुपये व दागिणे चोरीला गेले होते. सकाळी गावात या घटनेची माहिती पसरली, दरम्यान त्याच रात्री गावात आणखी दोन घरी चोरी झाल्याचे समोर आले. निलेश रंगारी यांच्या घरातून दहा हजार रुपये रोख व श्‍यामसुंदर घटी यांच्या घराचा दरवाजा तोडण्यात आला होता. घरात सर्व लोकं असतांनाही दरवाजे तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचे धाडस करणे हे समजण्या पलिकडले असल्याने चोरट्यांनी घरातील लोकांना बेशुद्ध केले असावे असाही तर्क लावण्यात येत आहे. 
चोरीच्या घटनानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास तीन युवक संदिग्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्याजवळ कार होती. कारने ते एमआयडीसीकडून वाडीकडे जाताना दिसले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One night three houses were raided,