ते शौचास जायला निघाले, पायऱ्यांवर पाय ठेवताच जोरजोरात ओरडू लागले...

https://www.esakal.com/vidarbha/appointment-blockade-teachers-chandrapur-district-278745
https://www.esakal.com/vidarbha/appointment-blockade-teachers-chandrapur-district-278745

धाबा (जि. चंद्रपूर) : दिवस गुरुवार... वेळ सायंकाळची... चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यातील अडेगाव येथे राहणारे शंकर राऊत हे शौचास चाण्यासाठी घराबाहेर निघाले. मात्र, पायरीवर नागोबा ठाण मांडून बसलेले होते. नागोबाला पाहताच भयभीत झालेले राऊत ये जोर-जोराने ओरडू लागले. लागलीच मुलाने सर्पत्रिमाला फोन करून बोलावले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर शंकर राऊत व त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्‍वास सोडला. 

साप म्हटलं की अनेकांची भवेरी उडते. सापाला पाहताच अनेकांच्या अंगाला शहारे येतात तसेच तोंडून आवाजही येत नाही. साप चावल्याने मृत्यू होतो हे माहित असल्याने कुणीही त्याच्या वाटी जात नाही. होईल तितक्‍या दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतात. घरात साप शिरला तर नागरिक ओरडत घराबाहेर पडतात.

साप... साप... साप... म्हणत दुसऱ्यांदा गोळा करतात. मात्र, कुणीही त्या सपाजवळ जाऊन पाहत नाही. दुरूनच काय करावं आणि काय करू नये याचा सल्ला दिला जातो. मात्र, ज्यांच्या घरी साप निघतो त्याला काही चैन पडत नाही. घरात तर दडून बसणार नाही ना... कुणाला चावला तर... असे एक ना अनेक प्रश्‍न त्याच्या मनात घर करीत असतात. मात्र, सापापासून कशी सुटका होईल याचा विचार करीत असतात... 

अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्‍यात राहणारे शंकर राऊत यांना घरी साप दिसला. ते गुरुवारी सायंकाळी शौचास जाण्यासाठी घराबहेर पडले. त्यांच्या घराला लागूनच शौचालय आहे. ते पायऱ्यावरून जात असताना त्यांना काहीतरी असल्याचा भास झाला. जवळ जाऊन बघितले असता त्यांना साप दिसला. 

सापाला पाहताच ते चांगलेच भयभीत झाले आणि जोर-जोरोत ओरडू लागले. राऊत यांना ओरडताना पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी ओरडण्यामागचे कारण विचारले असता शंकर यांनी साप दिसल्याचे सांगितले. मुलाने सर्पमित्राला भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडले व सुरक्षितस्थळी नेऊन सोडले.

सापाला सोडले सुरक्षितस्थळी

शंकर राऊत हे शौचास जाण्यासाठी निघाले असता त्यांना साप दिसला. शंकर राऊत यांचा मुलगा सुभाषने अनखोडा येथील सर्पमित्र प्रदीप नागुलवार, मृणाल वाकुडकार यांना भ्रमणध्वनीने साप निघाल्याची माहिती दिली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडले सुरक्षितस्थळी नेऊन सोडले. यावेळी बद्यांची मोठी गर्दी झाली होती. 

एकीकडे कोरोना दुसरीकडे सरपटणारे जीव

सद्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. यामुळे नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे. घराबाहेर निघाल्यास पोलिसांच्या मार खावा लागत आहे. असे असताना नागरिक घरात राहत आहे. दुसरीकडे वन्यजीव, सरपटणारे जीव ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण करीत आहे. यामुळे गावकरी चांगलेच धास्तावलेले आहेत. काय कराव आणि काय नाही असाच प्रश्‍न त्यांच्या मनात उपस्थित होत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com