

Gadchiroli News
esakal
गडचिरोली : बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री तसेच कॉर्पोरेट कंपन्यांकडून निर्माण करण्यात येणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) बुधवार (ता. २०) देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक दिली आहे. ही माहिती गडचिरोली डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅंड ड्रगिस्ट असोसिएशने अध्यक्ष देवेंद्र सोमनकर व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परीषदेत सोमवार (ता. १८) दिली.