
बुलडाणा : खरीप हंगाम तोंडावर असतानाही जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाचा वेग अत्यंत संथ असून, १,५०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २४७.५९ कोटींचेच वाटप झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज लवकरात लवकर म्हणजे ३० जूनपूर्वी नूतनीकरण करून केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनांचा लाभघ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.