esakal | अमरावतीला केवळ 212 रेमडेसिव्हिरचा पुरवठा; डॉक्‍टरांसमोर प्रश्‍नचिन्ह; 600 पेक्षा अधिकची गरज

बोलून बातमी शोधा

अमरावती जिल्ह्याला केवळ 212 रेमडेसिव्हिरचा पुरवठा; डॉक्‍टरांसमोर प्रश्‍नचिन्ह
अमरावती जिल्ह्याला केवळ 212 रेमडेसिव्हिरचा पुरवठा; डॉक्‍टरांसमोर प्रश्‍नचिन्ह
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : लशीप्रमाणेच रेमडेसिव्हिरच्या कमतरतेची परिस्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण झाली आहे. ऑक्‍सिजन तसेच व्हेन्टीलेटरवरील रुग्णांच्या तुलनेने अतिशय अल्प म्हणजेच केवळ 212 रेमडेसिव्हिरचा पुरवठा जिल्ह्यासाठी झालेला आहे. त्यामुळे हे इंजेक्‍शन्स नेमके कुणाला द्यावे, असा प्रश्‍न डॉक्‍टरांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.

ऑक्‍सिजन तसेच व्हेन्टीलेटरवरील गंभीर रुग्णांना डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार रेडेमेसिव्हिरचा वापर करण्यात येतो, मात्र मागील काही दिवसांपासून या इंजेक्‍शनची कमतरता दिसून येत आहे. इंजेक्‍शनकरिता रुग्णांच्या नातेवाइकांची पायपीट होत असते. शासनाकडून लशींचा पुरवठा ज्याप्रमाणे अल्प केला जात आहे, त्याच धर्तीवर आता रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा पुरवठा केला जात आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्याला जवळपास 600 इंजेक्‍शनची गरज आहे. किमान इंजेक्‍शन प्राप्त होतील अशी आशा असतानाच केवळ 212 इंजेक्‍शन देण्यात आली आहे. त्यामुळे आता या इंजेक्‍शन्सचा उपयोग कोण कोणत्या रुग्णांवर करावा याचा प्रश्‍न वैद्यकीय तज्ञांसमोर उभा ठाकला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ