Solar Pump Scheme : सौर कृषीपंपासाठी तीन हजारावर शेतकरी प्रतीक्षेत ; केवळ ३१ शेतकऱ्यांच्या शेतात सौर यंत्रणा उभारण्यात यश
Solar Agriculture : पीएम कुसुम आणि मागेल त्याला सौर कृषीपंप या योजनांतर्गत केवळ १,६१९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, ३ हजारांहून अधिक शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत. महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चंद्रपूर : कृषीपंपाच्या वीज जोडणीचे हजारो अर्ज महावितरणकडे प्रलंबित होते. डिमांड भरूनही अनेकवर्षे वीज जोडणी मिळाली नाही. यामुळे बळिराजासमोर निसर्गावर अवलंबून शेतीची मशागत करण्याशिवाय पर्याय नव्हता.