
चंद्रपूर : खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. बी- बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची आवश्यकता आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी पीककर्ज वितरणात आखडता हात घेतला आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांत केवळ ६८ टक्केच पीककर्जाचे वाटप झाले आहे. -ंद्रपूर जिल्ह्याला ११५० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आजघडीला केवळ ७१ हजार ३३ शेतकऱ्यांना ७७६ कोटी ५७ लाख रुपये एवढेच पीककर्ज वाटप करण्यात प्रशासनाला यश आले आहे.