कोरोना संशयित रुग्ण असल्याची केवळ अफवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

तालुक्यात कोरोना व्हायरस संदर्भात संशयित एकही रुग्ण नसून परदेशातून परतलेले कुटुंबाचे मुंबई विमानतळावर स्क्रीन तपासणी झाली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधीक्षक डॉ. आस्मा यांनी केले आहे. आरोग्य विभाग सतर्क असून अफवा पसरविणाऱ्यावर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : तालुक्यात कोरोना व्हायरस संदर्भात संशयित एकही रुग्ण नसून परदेशातून परतलेले कुटुंबाचे मुंबई विमानतळावर स्क्रीन तपासणी झाली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधीक्षक डॉ. आस्मा यांनी केले आहे. आरोग्य विभाग सतर्क असून अफवा पसरविणाऱ्यावर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

शहरातील एका कुटुंबातील चार जण दुबई येथून नुकतेच परतले त्यांच्या संदर्भात पसरविण्यात आलेल्या अफवा ह्या केवळ अफवाच असून, त्यांना कुठलाच त्रास नाही मुंबई विमानतळावर त्यांच्या स्क्रीन तपासण्या झाल्या आहे. त्या निगेटिव असल्याचा अहवाल मुंबई आरोग्य विभागाने दिला आहे. दरम्यान केरोना व्हायरस हा आजार संवेदनशील असून, कोणीही या संदर्भात गंमत म्हणून अफवा पसरवू नये, पोलिस प्रशासन अफवा पसरविणाऱ्यावर करडी नजर ठेवून असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ‘सकाळ’शी बोलताना ठाणेदार एस. आर. पाटील यांनी दिला. तर तालुक्यात एकही रुग्ण कोरोना व्हायरस संशयीत नाही, नागरिकांनी घाबरण्याचे कुठलेच कारण नसून आरोग्य विभाग या बाबतीत सतर्क आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन आरोग्य अधीक्षक डॉ. अस्मा यांनी केले आहे.

नागरिकांमध्ये जागृती
देशाच्या काही राज्यासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संशयित रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत विविध मार्गाने प्रयत्न केले जात आहे. याचेच फलित म्हणून शहरासह छोट्या गावातही नागरिक मास्कचा वापर करीत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळल्या जात असून, लोकांशी संपर्क येत असलेल्या व्यवसायिक खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only rumors that Corona was a suspected patient