अमरावती शहरात पोलिसांचे ऑपरेशन 'ऑलआऊट' सुरु; तीन तलवारींसह दोघांना अटक

Operation All out is going on in Amravati
Operation All out is going on in Amravati
Updated on

अमरावती ः शहरात अवैध अग्निशस्त्रासह तलवारीसारखे घातक शस्त्र सापडण्याची श्रृंखला सुरूच आहे. गुन्हेशाखेने बुधवारी (ता. 24) मध्यरात्रीनंतर संतोषीनगर परिसरातून दोघांना अटक करून घरझडतीमध्ये त्यांच्याकडून एकूण तीन तलवारी जप्त केल्या.

अमोल देवेंद्र सूर्यवंशी (वय 30, संतोषीनगर) आणि महेश अनिल मोहोड (वय 19, जयसियारामनगर) अशी दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. गाडगेनगर पोलिसांत नमुद दोघांविरुद्ध आर्मऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. असे पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी सांगितले. 

अमोल हा रात्रीच्या सुमारास तलवारीसह वावरत होता. पोलिस दिसताच तो घरात पळाला. त्याला पकडताच घरामधुन एक मोठी व छोटी अशा दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. महेशच्या अटकेनंतर त्याच्या जवळची तलवार त्याने जयसियारामनगर येथील एका दुकानाच्या टिनाच्या शेडमध्ये ठेवल्याचे सांगितले. 

जप्त तीन तलवारी 4 हजार 300 रुपये किंमतीच्या आहेत. दोघांना गुन्हेशाखेने गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. महेश व अमोल विरुद्ध आर्मऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल झाला. गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. एन. सय्यद, राजेंद्र काळे, देवेंद्र कोठेकर, मोहंमद सुलतान, विशाल वाकपांजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

6 तडीपार शहरातच सापडले

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे ज्या लोकांना जिल्ह्याबाहेर ठराविक मुदतीसाठी हद्दपार केले अशा लोकांकडून नियमांचा सतत भंग होतांना दिसतो. पोलिसांचा आदेश झुगारून पुन्हा शहरात राहात असलेले सहा तडीपार शहरातच आढळले. ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

दहा दिवसात पाच कट्टे जप्त

अवैध अग्निशस्त्रांचा शहरात मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दहा दिवसात पाच देशी बनावटीचे कट्टे व 27 जिवंत काडतूस चौघांकडून जप्त केले. अवैध अग्निशस्त्र हे मध्यप्रदेशच्या पाचोरा येथून मागविल्या जातात अशी माहिती आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com