Monsoon Update: पूर्व विदर्भात आज ‘ऑरेंज अलर्ट’; नागपूर, गोंदिया, चंद्रपूर जोरदार पावसाची शक्यता,कसे असेल हवामान? जाणून घ्या
Orange Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असून, पूर्व विदर्भात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा व अन्य भागांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे. उद्या (ता. ७) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.