महावितरणच्या जनजागृतीचा परिणाम: दीड हजार कोटींचा वीजबिलांचा भरणा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

तो दूर ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क, ग्राहक मेळावे, वेबिनार, विशेष मदत कक्ष,लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्राहकांसाठी माहिती देण्यासाठी व्हॉट्‌स ऍप ग्रुप या शिवाय ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस व बिल तपासण्यासाठी वेबलिंक आणि वीज बिलवर बिलाची संपूर्ण माहिती या प्रभावी उपाययोजना केल्या.

चंद्रपूर :  मार्च महिन्यांत कोरोना विषाणूने हातपाय पसरले. त्यामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत विदर्भातील ३५ लाख ३९ हजार २०० ग्राहकांनी १ हजार ४५४ कोटी रुपयांचे वीजबिल भरली. वीजबिलांचा भरणा करण्याबाबत महावितरण कंपनीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. त्याचा हा परिणाम आहे. 
लॉकडाउनमुळे रिडींग न घेता आल्याने महावितरण कंपनीने ग्राहकांना तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल पाठविले होते. अवाढव्य आलेल्या वीजबिलांबाबत ग्राहकांच्या मनात संशय होता. तो दूर ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क, ग्राहक मेळावे, वेबिनार, विशेष मदत कक्ष,लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्राहकांसाठी माहिती देण्यासाठी व्हॉट्‌स ऍप ग्रुप या शिवाय ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस व बिल तपासण्यासाठी वेबलिंक आणि वीज बिलवर बिलाची संपूर्ण माहिती या प्रभावी उपाययोजना केल्या.

हे वाचा— वर्धेच्या शिरपेचात मानाचा तुरा! मिळाला राष्ट्रीय पातळीचा हा पुरस्कार.. कारण वाचून वाटेल अभिमान...

नागपूर प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत एकूण २६६ वेबिनार व १ हजार ७७८ विशेष मदत कक्ष उभारण्यात आले. त्याचा लाभ १ लाख ७५ हजार ग्राहकांनी घेतला. या सर्व उपाययोजनांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देत मोठ्या संख्येत वीजबिलांचा भरणा केला आहे. २ टक्‍के सवलतीसह बिल भरण्यासाठी हप्तेही पाडून देण्यात आले. त्यामुळे विदर्भातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ३५ लाख ग्राहकांनी १ हजार ५४५ कोटी रुपयांचा वीज बिलांचा भरणा केला आहे. १ एप्रिल ते २८ जुलै या काळात नागपूर प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूर परिमंडलात सर्वाधिक सुमारे १५ लाख ६ हजार ५२० ग्राहकांनी ८६९ कोटी, चंद्रपूर परिमंडळात ५ लाख ६१ हजार ७५० ग्राहकांनी २१९ कोटी, अमरावती परिमंडळात ५ लाख ८६ हजार ४१० ग्राहकांनी १९७ कोटी , गोंदियात ४ लाख ११ हजार ३४० ग्राहकांनी ११५ कोटी आणि अकोला परिमंडलातील सुमारे ४ लाख ७३ हजार २०० ग्राहकांनी १४३ कोटी एवढा वीज बिलांचा भरणा केला आहे. 

 

  
 -संपादन ः चंद्रशेखर महाजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outcome of MSEDCL's public awareness: Payment of electricity bills of Rs