esakal | यवतमाळमधील 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' सर्वेक्षणात आढळला 51 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

corona

यवतमाळमधील 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' सर्वेक्षणात आढळला 51 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग

sakal_logo
By
- टीम ई-सकाळ

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी राज्य शासनाने 15 सप्टेंबर व 25 ऑक्‍टोबर या कालावधीत "माझं कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम हाती घेतली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला दोन वेळा भेटी दिल्या. या सर्वेक्षणात तब्बल 51 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले तर, आता यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी "आम्ही यवतमाळकर...करू कोरोनावर मात...' ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

कोविड-19चा पहिला रुग्ण चिनच्या वुहान शहरात डिसेंबर 2019मध्ये आढळून आला होता. भारतात पहिला रुग्ण 30 जानेवारीला केरळ येथे आढळला, तर राज्यात पहिला रुग्ण नऊ मार्च रोजी पुणे येथे आढळला. 15 जानेवारीपर्यंत 19.84 लाख बाधित झाले. त्यापैककी 18.81 लाख हजार बरे झाले.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 94.8 टक्के होती. या कालावधीत 50,336 मृत्यू झाले. प्रतिलाख लोकसंख्येमागे रुग्णसंख्या 15,649 होती. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात 2.76 कोटी कुटुंबांपैकी 2.74 कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. 11.92 कोटी लोकांशी थेट संपर्क शोधण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात 2.70 कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. 10.01 कोटी लोकांना भेटी देण्यात आल्या.

राज्यात सर्वेक्षणात आढळलेल्या तापसदृस्य लक्षणे व श्‍वसन संस्थेचा तीव्र आजार असणाऱ्या (सारी) 3.57 लाख रुग्णांपैकी 3.22 लाख रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आली. त्यात 51,064 जणांना कोविडचा संसर्ग आढळून आला. त्यांच्यावर आवश्‍यकतेनुसार उपचार करण्यात आले.

कोविड निदानासाठी प्रयोगशाळा

राज्यात कोविड निदानासाठी 15 जानेवारीपर्यंत 487 प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या. प्रत्येक बाधित रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी संपर्क शोध पथके स्थापित करण्यात आली. खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आणल्या. खासगी रुग्णालयाच्या बिलाबद्दल तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्यात आली.

संपादन - अथर्व महांकाळ