
उमरखेड : यवतमाळ-नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या पैनगंगा वन्यजीव अभयारण्याला आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. आमदार वानखेडे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी केली होती. वनमंत्र्यांनी हिरवी झेंडा दाखविल्याने अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.