महागाव - पल्लवी विकास भुतेकर (वय-२३) या विवाहितेचा मृतदेह काल सोमवारी सकाळी मुडाणा येथे शेतातील विहिरीत आढळून आला. पोलिसांनी घाई गडबडीत या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून, आरोपी सासरे आणि पतीस अटक केली असली तरी पल्लवीने आत्महत्या केली नसून सासरच्या क्रूरकर्म्यांनी तिचा सुनियोजित पणे खून केला असल्याचा आरोप अखिल भारतीय वडार सक्षम संघाचे प्रदेशाध्यक्ष विलास पवार यांनी केला आहे.