

Yavatmal News
sakal
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : चक्क मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून एका अभियंत्याने शासन व प्रशासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवीन कचरा हातगाडी खरेदीच्या करारनाम्यावर हा ‘हातसफाई’ चा प्रकार घडला असून, पांढरकवडा नगर परिषदेत सध्या या ‘बनावट’ कारभाराचीच जोरदार चर्चा आहे.