
आर्णी (जि. यवतमाळ): महाराष्ट्राच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी सोमवारी (ता. २०) आर्णीतील कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली होती. शिवनेरी चौकात पारंपरिक पद्धतीने लाडूतुला करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने व्यवस्था केली होती. परंतु, पंकजा मुंडे यांचा ताफा गावात न थांबताच नागपूरला रवाना झाल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले.