Buldhana News: पपईची रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; उन्हापासून बचावासाठी रोपांना दिले ‘मिल्की बॅग’चे संरक्षण कवच

Farmers Protect Papaya Saplings from Extreme Heat: तळणी परिसरातील शेतकऱ्यांनी पपईच्या कोवळ्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी उन्हापासून बचावासाठी ‘मिल्की बॅग’चे कवच लावले
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

मोताळा: सध्या तापमानाचा पारा वाढला असून, पिकांवरही विपरीत परिणाम होत आहे. दरम्यान, उन्हाच्या तडाख्यातून पपईच्या कोवळ्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी तळणी येथील शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी प्रत्येक रोपा भोवती ''मिल्की बॅग'' चे संरक्षण कवच लावले आहे.

तालुक्यातील तळणी परिसरात गेल्या महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली आहे. सद्यस्थितीत वाढत्या उष्णतेमुळे जनजीवनासह शेती पिकांवरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे पिके कोमेजून जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com