पराभवाला कॉंग्रेसचे पदाधिकारीच कारणीभूत : सुरेश भोयर यांचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

कामठी (जि.नागपूर)  : कामठी विधानसभा निवडणुकीत नगरपालिकेच्या कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास अप्रत्यक्षरित्या मदत केल्यामुळे परिसरात कॉंग्रेसला मतदान कमी झाले व मला निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवास कारणीभूत असलेल्या स्थानिक नगरपालिकेच्या काही कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडे करून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कामठी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील मतदारांनी दिलेल्या भरघोस प्रतिसाद व आशीर्वादाने एक लाखापेक्षा अधिक मते मिळाली. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत दिली. अल्पशा मतांमुळे निसटता पराभव झाला. कामठी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावागावांत जाऊन प्रत्यक्ष मतदारांशी भेटून मतदारांचे आभार व्यक्त करणार असल्याचे व कॉंग्रेस पक्षाच्या नावावर कामठी नगरपालिकेत सत्ता स्थापन केली व पदाचा दुरुपयोग करून पालिकेतील विविध कामात गैरव्यवहार करून कॉंग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले. त्यांची तक्रार करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सर्व ताकदीनिशी कार्य करून जिल्हा परिषदेवर आघाडीची सत्ता स्थापन करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकारपरिषदेला प्रदेश कॉंग्रेस महासचिव सुरेश भोयर यांच्यासह नागपूर ग्रामीण युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रोशन खडसे, कामठी तालुका अध्यक्ष सचिन भोयर, मौदा पंचायत समितीचे उपसभापती राजेश ठवकर, रामटेक मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र लांडे आदी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parabhavala causes Congress office bearers: Suresh Bhoyar