परभणी : आकाशवाणीच्या ३२ उद्‍घोषकांचा आवाज दबला

परभणी आकाशवाणीची तिसरी प्रसारण सभाही बंद; अनेकांमधून नाराजी व्यक्त
Parbhani All India Radio third broadcast meeting closed
Parbhani All India Radio third broadcast meeting closed
Updated on

परभणी : सन २००३ मध्ये मोठ्या जल्लोषात परभणी आकाशवाणीचे स्वायत्त केंद्र सुरु करण्यात आले होते. परंतु, अवघ्या १९ वर्षांच्या कालावधीतच हे केंद्र बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची सुरवात १ फेब्रुवारी पासून झाली असून, या दिवशी या केंद्रावरून प्रसारित होणारी दुसरी सभा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता १ जूलै पासून तिसरी सभाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्रात काम करणाऱ्या ३२ उद्‍घोषकांच्या नोकरीचे काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.

परभणी आकाशवाणी केंद्र हे मराठवाडा विभागातील प्रक्षेपण क्षमतेने सर्वात मोठे असलेले केंद्र आहे. पूर्वी या केंद्रावरून औरंगाबाद केंद्रावरील कार्यक्रम प्रक्षेपित केले जायचे. परंतु, श्रोत्यांची मागणी लक्षात घेता २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळातील तत्कालीन केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री, दूरसंचारमंत्री (कै.) सुषमा स्वराज यांनी मान्यता देवून या परभणी आकाशवाणी केंद्राला स्वायतत्ता प्रदान केली होती.

त्यामुळे या केंद्रावरून अनेक लोकोपयोगी योजनांची माहिती व लोकरंजक दर्जेदार कार्यक्रम सादर होऊ लागले होते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विविध निर्णयांची माहिती थेट वाडी, वस्त्यापर्यंत पोहचली गेली. त्यात परभणीचे केंद्र स्वायत्त झाल्याने खास परभणीतील नामवंत कलावंत व उद्‍घोषकांमुळे मराठवाडी शैलीत कार्यक्रम सादर केले जात असल्याने ते लोकांच्या थेट ह्रदयापर्यंत पोहचले जात असत. त्यातून आकाशवाणीशी चांगला व चोखंदळ श्रोता वर्ग जोडल्या गेला होता.

आज दूरसंचार क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र बदलातही लोकांचे रेडिओ व विशेष करून आकाशवाणीवरील प्रेम काही कमी झालेले नाही. सध्या परभणीच्या आकाशवाणी केंद्रात जवळपास ३२ उद्‍घोषक आपली सेवा बजावत आहेत. सर्व काही चांगले सुरू असतानाच अचानक केंद्रीय स्तरावरून परभणीच्या आकाशवाणी केंद्राचे प्रसारण बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. स्थानिक प्रसारण बंद झाल्यामुळे स्थानिक कलावंत, मार्गदर्शक, वक्ते, विद्यार्थी यांच्याबरोबरच निवेदकांचा रोजगार देखील जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आता केवळ शोभेचे बाहुले...!

परभणीच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या दोन सभा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यात ता. १ फेब्रुवारी २०२२ रोजी दुसरी सभा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर ता. १ जुलै २०२२ पासून तिसरी सभा म्हणजे सायंकालीन सभा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झालेला आहे, असे समजते. आता आकाशवाणी परभणी केंद्र हे शोभेचे बाहुले म्हणून शिल्लक राहिले आहे, असेच म्हणावे लागेल.

रेटा वाढविण्याची गरज

रेडिओ ऐकतो किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नसून, केंद्र शासनाचे एक महत्त्वाचे कार्यालय पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. या विषयी लोकांची एकजूट होणे अपेक्षित आहे. या संदर्भात ता. ५ जूलै रोजी आकाशवाणी परभणी केंद्रात काम करणारे कर्मचारी व श्रोत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती आकाशवाणीत काम करणाऱ्या उद्‍घोषकांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com