Washim News : वंचितच्या प्रदेश कार्यकारिणी निवडीनंतर नाराजीच्या चर्चांना वेग, माजी जिल्हा संघटक पारितोष इंगोले यांच्या पक्षांतराने वाशिमच्या राजकीय वर्तुळात चर्चा

Paritosh Ingole Joins Republican Sena After Leaving Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक पारितोष इंगोले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला.
Paritosh Ingole Joins Republican Sena After Leaving Vanchit Bahujan Aghadi

Paritosh Ingole Joins Republican Sena After Leaving Vanchit Bahujan Aghadi

esakal

Updated on: 

वाशिम : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू मानले जाणारे आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावलेले इंजिनिअर पारितोष इंगोले यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीची साथ सोडली आहे. पक्षाचे माजी जिल्हा संघटक असलेल्या इंगोले यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केल्याने वाशिम जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला हा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीसाठी संघटनात्मक धक्का मानला जात असून, प्रदेश कार्यकारिणी निवडीनंतर पक्षात निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Loading content, please wait...