esakal | स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर 'या' गावाला मिळणार हक्काची पाऊलवाट, लवकरच पालटणार चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

footpath

स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर 'या' गावाला मिळणार हक्काची पाऊलवाट, लवकरच पालटणार चित्र

sakal_logo
By
प्रतिक मालवीय

धारणी (जि. अमरावती) : स्वातंत्र्याच्या तब्बल 73 वर्षांनंतर मेळघाटच्या एका गावात पहाट उजाडली आहे. खडीकरण, रस्ता तर सोडाच एका पाऊलवाटेसाठी (parsoli will get own footpath) या गावाला आजवर प्रतीक्षा करावी लागली, हे ऐकून कदाचित कुणाचा विश्वाससुद्धा बसणार नाही. शहरात फ्लायओव्हर होत असताना तसेच काँक्रिटीकरणात रस्ते चकाचक होत असताना मेळघाटच्या (melghat of amravati) आदिवासीबहुल गावाची ही अवस्था शासकीय व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी होती. मात्र, अखेर धारणीच्या उपविभागीय अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी पुढाकार घेतल्याने या गावाला आता पाऊलवाट मिळणार आहे. (parsoli village of melghat will get own footpath after 73 years of post independence)

हेही वाचा: 'पॉझिटिव्ह' सासू नको गं बाई; कोरोना व्हावा म्हणून सूनेला मिठी

मेळघाट हे समस्येचे माहेरघर असलेले क्षेत्र म्हणून ओळखले जाते. आजही मेळघाटमध्ये बऱ्याच समस्या कायम आहेत. रस्ते, वीज, पाणी या प्राथमिक गरजेपासून कोसोदूर असलेल्या मेळघाटातील काही गावे रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहेत. धारणी तालुक्यातील मोगर्दा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले परसोली ढाणा ही छोटीशी वस्ती. ग्रामपंचायत, तालुकास्तर, वैद्यकीय सुविधा, दळणवळण व संपर्काकरिता परसोलीवासीयांना एकप्रकारे संघर्षच करावा लागत होता. सर्वांत भयावह परिस्थिती तर पावसाळ्यात होते. छोटे छोटे नाले दळणवळणात बाधा उत्पन्न करतात. शिवाय पूरग्रस्त परिस्थितीत तर अतोनात हाल परसोलीवासीयांचे होत होते. अशा भीषण परिस्थितीला ग्रामपंचायत मोगर्दा अंतर्गत येत असलेले परसोली हे गाव स्वातंत्र्याच्या 73 वर्षांपासून रस्त्याअभावी अनेक समस्यांना तोंड देत होते.

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी उपविभागीय अधिकारी धारणी पदाचा पदभार सांभाळला व येथील स्थितीचा अभ्यास केला. शासनाची महत्त्वाकांक्षी व ग्रामीण भागातील रस्त्याचा विकास करणारी पालकमंत्री पांदण रस्ते योजना ही त्यांच्या लक्षात तर होतीच, शिवाय परसोली गावातील समस्येवरसुद्धा त्यांनी लक्ष पुरविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पालकमंत्री पांदण रस्ता अभियानांतर्गत अभिसरण संकल्पनेखाली ठक्कर बाप्पा योजनेच्या निधीची जोड देऊन तातरा ते परसोली एकूण 4.50 किलोमीटर रस्त्याकरिता 60 लाख 14 हजार 195 रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवून घेतली. आता ई- टेंडरिंगची प्रक्रिया जिल्हापरिषदेच्या बांधकाम उपविभाग धारणीमार्फत पूर्णत्वास येत आहे. सदर कामावरील अकुशल काम हे ग्रारोहयो अंतर्गत मजुरांव्दारे केले जाणार असून त्यामुळे मजुरांनासुद्धा काम उपलब्ध होणार आहे.

धारणी तालुक्यात पांदण रस्ते योजनेअंतर्गत प्रथमच रस्ता खडीकरणाचे काम होणार असून सर्वांत जास्त आनंद हा परसोली येथील ग्रामवासीयांच्या चेहऱ्यावर दिसणार आहे. ज्याप्रकारे डॉ. मिताली सेठी यांनी हक्काची पाऊलवाट उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात गावातील इतरही समस्या सोडविण्यावर भर द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

loading image