उमरेड-गिरड मार्गावर वाघ दिसला

गोकुल वैरागडे
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नांद, (जि.नागपूर ) : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगतच्या नांदच्या जंगलात उमरेड-गिरड मार्गावरून जाणाऱ्या एसटीतील प्रवाशांना वाघ दिसला. प्रवाशांनी डोळे भरून वाघाला पाहण्याचा हा प्रसंग मोबाईलच्या कॅमेऱ्यातही टिपला. यानंतर व्याघ्रदर्शनाची व्हिडिओ क्‍लिप सर्वत्र व्हायरल झाली.बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास उमरेड-गिरड मार्गावरून उमरेड-नांद-भिवापूर ही बस बेसूरमार्गे जात होती. बेसुर गावाजवळ जंगलात सतीमायचे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरातील हिरव्या घनदाट जंगलात वाघ फिरत असल्याचे बसचालकाला दिसले. वाघ रस्त्याच्या कडेला असल्याने चालकाने बस थांबविली.

नांद, (जि.नागपूर ) : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगतच्या नांदच्या जंगलात उमरेड-गिरड मार्गावरून जाणाऱ्या एसटीतील प्रवाशांना वाघ दिसला. प्रवाशांनी डोळे भरून वाघाला पाहण्याचा हा प्रसंग मोबाईलच्या कॅमेऱ्यातही टिपला. यानंतर व्याघ्रदर्शनाची व्हिडिओ क्‍लिप सर्वत्र व्हायरल झाली.बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास उमरेड-गिरड मार्गावरून उमरेड-नांद-भिवापूर ही बस बेसूरमार्गे जात होती. बेसुर गावाजवळ जंगलात सतीमायचे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरातील हिरव्या घनदाट जंगलात वाघ फिरत असल्याचे बसचालकाला दिसले. वाघ रस्त्याच्या कडेला असल्याने चालकाने बस थांबविली. अचानक बस का थांबविली, असे विचारण्यापूर्वीच "वाघ पाहून घ्या', असे चालकाने म्हणताच, सारे प्रवाशी वाघाला पाहू लागले. वाघ दिसल्याने अनेकांनी मोबाईलमध्ये या प्रसंगाचे चित्रण केले. व्हिडिओ पाहिल्यावर गोंधळ घालू नका, असेही प्रवासी एकमेकांना सांगत असल्याचे ऐकू येते. या परिसरात उन्हाळ्यापासून वाघाचे वास्तव्य आहे. यापूर्वीदेखील याच मार्गावर अनेकदा दुचाकी व चारचाकी वाहनाचालकांना वाघ दिसला आहे. गुराखी अनेकदा या भागात गुरे घेऊन गेल्यावर जनावरांची शिकार वाघाने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers saw a tiger on the Umred-Gir route