esakal | घनदाट जंगलातील तब्बल तीन नाले पार करून 'त्यांनी' केले असे काही; समाजासमोर निर्माण केला आदर्श..   
sakal

बोलून बातमी शोधा

Path foundation people helped village in Chamorshi read full story

तालुक्‍यातील सोमनपल्ली गावाला मागच्या वर्षी पुराचा मोठा फटका बसला होता. अनेकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्‍याच्या ठिकाणापासून 20-25 किमी अंतरावर असूनसुद्धा हे गाव अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे.

घनदाट जंगलातील तब्बल तीन नाले पार करून 'त्यांनी' केले असे काही; समाजासमोर निर्माण केला आदर्श..   

sakal_logo
By
अमित साखरे

चामोर्शी (जि. गडचिरोली) : सध्या सर्वत्र कोरोना महामारीचे सावट असतानाही काही युवक जिवाची बाजी लावून समाजकार्य करत आहेत. तालुक्‍यातील सोमनपल्ली या घनदाट अरण्यातील गावाने दिलेल्या मदतीच्या हाकेला ओ देत येथील पाथ फाउंडेशनच्या युवकांनी असेच काम करून दाखवले आहे. 

तालुक्‍यातील सोमनपल्ली गावाला मागच्या वर्षी पुराचा मोठा फटका बसला होता. अनेकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्‍याच्या ठिकाणापासून 20-25 किमी अंतरावर असूनसुद्धा हे गाव अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे. गावात जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही. तेथील रहिवाशांना जंगल मार्गाने 3 नाले ओलांडून 2-3 किमी पायपीट केल्याशिवाय पर्याय नाही. पावसाळ्यात हे नाले भरल्यानंतर या गावाचा संपर्क तुटतो. गावात एक घर वगळता सर्व घरे मातीची आहेत. पावसाळ्यात प्रत्येकाच्या घरात पाणी गळतीची समस्या असते. अशा अनेक समस्या त्यांच्या पुढे उभ्या असतात. 

हेही वाचा - गोंधळच गोंधळ! 200 रुपये बिल येणाऱ्या ग्राहकांना आले 15 हजारांचे बिल; नेट मीटर धारकांनाही महावितरणचा शॉक

जंगलातील नाले केले पार 

या गावाची व्यथा जाणून घेत पाथ फाउंडेशन व चामोर्शीतील युवकांनी घनदाट जंगलातील तब्बल तीन नाचले पार करून या गावाला मदतीचा हात दिला. सोमनपल्ली गावात ताडपत्री, ब्लॅंकेट, टॉर्च व भांडे अशा वस्तू मदत म्हणून देण्यात आल्या. यासोबतच मुधोली टोला व निकतवाडा या गावांमध्येसुद्धा गरजूंना वस्तू मदत स्वरूपात देण्यात आल्या. 

 समाजापुढे निर्माण केला आदर्श 

जंगल मार्गाने सामान घेऊन पायपीट करत पाथ फाउंडेशनचे बोधी रामटेके, अनिकेत बांबोळे व डॉ.अजिंक्‍य चकोर, नीरज येग्लोपवार, चक्रधर मेश्राम यांनी प्रत्यक्ष मदत पोहचवली. अंकुश गोयल, डॉ. हरमानप्रित सिंह, सतीश जतेगावकर, हेल्पिंग हॅण्ड्‌सचे अतीष चिंतलेवार यांनी या कामाला सहकार्य केले. त्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले असून या युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

जाणून घ्या - घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल 1500 वर्ष जुनी; इतिहास बघितला आणि सर्वांनाच बसला धक्का..

सर्वांनी मदत करावी... 

गडचिरोली जिल्ह्यात अनेक समस्यांनी गांजलेली कित्येक गाव आहेत. शासन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असेलच. पण, प्रत्येकाने आपले सामजिक कर्तव्य समजून अशा गावांना आपल्या परीने मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पाथ फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ