Amravati News: चार महिन्यांपासून महामार्गावर दिव्याखाली अंधार;एक महिन्यापासून संथगतीने दुरुस्ती, अपघाताचे प्रमाण वाढल्याने संताप

Darkness Continues on Pathrot Highway for Four Months: पथ्रोट गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे.
Amravati News

Amravati News

esakal

Updated on

पथ्रोट : मागील चार महिन्यांपासून महामार्गावरील पथदिव्यांच्या खालचा अंधार कायम असून त्यानंतर सुरू करण्यात आलेले दुरुस्तीचे काम महिन्याभरापासून अत्यंत संथगतीने सुरूच आहे. त्यामुळे असुविधा व अपघाताचे प्रमाण वाढल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अमरावती यांनी पथ्रोट गावातून जाणाऱ्या अंजनगाव ते मध्य प्रदेश बॉर्डर महामार्गावर पथ्रोट गावाच्या लांबितले चार पदरी काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. त्यावर २४ मे २०२१ ला २९ पथदिव्यांची उभारणी करून ते ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com