Buldhana News: पातूर्डा शाळा ते आठवडी बाजार रस्ता काम संथगतीने; नागरिक संतप्त; ५०० मीटर रस्ता अर्धवट; दर्जाहीन कामामुळे रहिवाशांचा त्रास
Poor Quality and Half-Done Road Raises Concerns: संग्रामपूर तालुक्यातील पातूर्डा येथील जिल्हा परिषद शाळा ते आठवडी बाजार ५०० मीटर रस्ता संथगतीने सुरू आहे. काम दर्जाहीन असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
संग्रामपूर: तालुक्यातील पातूर्डा येथील जिल्हा परिषद शाळा ते आठवडी बाजार पर्यंत च्या ५०० मीटर रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच झालेले काम सुध्दा दर्जाहीन असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.