शिथिलतेत यवतमाळकरांना कोरोना नियमांचा विसर; बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी

शिथिलतेत यवतमाळकरांना कोरोना नियमांचा विसर; बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी
Updated on

यवतमाळ : कोरोनाचा (Corona Virus) वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या सहा एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधानंतर सोमवारपासून (ता.सात) शिथिलता (Maharashtra Unlock) देण्यात आली. दीर्घ कालावधीनंतर दिवसभर घराबाहेर खरेदीसाठी पडता आल्याने नागरिकांची गर्दी होती. शिथिलतेत नागरिकांना मात्र, नियमांचा विसर पडला आहे. (people not following covid guidelines in Yavatmal after unlock)

शिथिलतेत यवतमाळकरांना कोरोना नियमांचा विसर; बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी
सोशल मीडिया खरंच पूर्णपणे बंद झाला तर? कसं असणार त्यानंतरचं जग

‘ब्रेक दि चेन’अंतर्गत घालून दिलेल्या निर्बंधात दुसर्‍या टप्प्यात मोठ्या शिथिलता देण्यात आली. दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुधडेअरी, बेकरी, मिठाई आदी खाद्यपदार्थासह कपडा, स्टिल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाचे टाळे मोकळे झाल्याने व्यापार्‍यांना दिलासा मिळाला. बाजारपेठेत खरेदीसाठी येणार्‍यांची संख्या वाढली आहे. दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्याच्यादृष्टीने जास्तीत जास्त होम डिलेव्हरीद्वारे वस्तूंचा पुरवठा करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही.

मुभा देण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये दुकान मालक, कामगार व ग्राहक यांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॉनिटायझर किंवा हॅन्डवॉशने नियमित हाताची स्वच्छता या कोविड त्रीसुत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक केले. पालन न केल्याचे आढळून आल्यास दंडाचा इशाराही देण्यात आला. त्याकडेही पाठ फिरविल्या जात आहे.

बाजारपेठेत गर्दी होत असल्याने शहरातील प्रमुख चौकात वाहतूक कोंडीदेखील होत आहे. पहिल्या लाटेत लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच नागरिकांनी कोरोना नियमाकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका दुसर्‍या लाटेत बसला. कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केलेत. त्याचा फायदा होत संसर्ग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, नागरिकांनी आता त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष केल्यास तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिथिलतेत यवतमाळकरांना कोरोना नियमांचा विसर; बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी
'सुरजागड पहाडावरील एक दगडही उचलू देणार नाही'; नाना पटोले संतापले

भाजीमंडीत ‘मास्क’ खिशात

भाजीमंडीत सकाळी भाजीविक्री करण्यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या संख्येने येतात. कमी भावात भाजीपाला मिळत असल्याने मॉर्निंक वॉकसाठी घराबाहेर जाणार्‍यांसह किरकोळ विक्रेते आणि नागरिकही खरेदीसाठी गर्दी करतात. या ठिकाणीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. संसर्ग रोखण्यासाठी असलेल्या मास्कलाही अनेक जण खिशात ठेवतात. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

(people not following covid guidelines in Yavatmal after unlock)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com