धक्कादायक...! तब्बल तीन दिवस कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्ती या गावात

निलेश झाडे
शुक्रवार, 22 मे 2020

चार रुग्णांच्या संपर्कातील एक व्यक्ती मागील तिन दिवसांपासून गोंडपिंपरी तालूक्यातील धाबा येथील साुूरवाडीत वास्तव्यास होता. दरम्यान आरोग्य ,पोलिस विभागाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून तपासणीसाठी चंद्रपूरला पाठविण्याची तयारी चालविली आहे.

धाबा(जि. चंद्रपूर) : चंद्रपूरात एकाचवेळी नऊ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यातील चार रुग्णांच्या संपर्कातील एक व्यक्ती मागील तिन दिवसांपासून गोंडपिंपरी तालूक्यातील धाबा येथील साुूरवाडीत वास्तव्यास होता. दरम्यान आरोग्य ,पोलिस विभागाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून तपासणीसाठी चंद्रपूरला पाठविण्याची तयारी चालविली आहे. तर सासूरवाडीतील कुटूंबियांचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे.या प्रकाराने धाब्यात खळबळ उडाली आहे.धाबा ग्रामपंचायतेने तातडीची बैठक बोलवली. सदर व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना बाधित आल्यास त्या पार्श्वभूमीवर  घेण्यात येणाऱ्या दक्षतेवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात एकाच वेळी नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या नऊ रुग्णापैकी चार रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती मागील तीन दिवसांपासून गोंडपिपरी तालूक्यातील धाबा येथे वास्तव्यास होता. हा व्यक्ती मुळचा सिंदेवाही तालुक्यातील असून त्याची सासूरवाडी धाबा येथे आहे. कोरोनाबाधित रुग्णांनी दिलेल्या माहीतीचा आधारे आज पोलिस,आरोग्य ,महसूल विभागाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. सासूरवाडीतील पाच व्यक्तींचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - कर्जमाफी झाली, आता पीककर्ज देण्यास बँकेची ना, काय आहे कारण...

सदर व्यक्तीला तपासणीसाठी चंद्रपूरला पाठविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.धाबा ग्रामपंचायतमध्ये तातडीची बैठक बोलाविण्यात आली.  नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:ची काळजी घ्यावी. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आव्हान सरपंच रोषणी अनमुलवार यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A person in contact with corona positives stayed in this village