करडी : येथील पाॅवर हाऊस जवळ सकाळी कामावर जात असलेल्या मजुरांचा पिकअप उलटून अपघात झाला. यात १६ जण जखमी झाले. त्यापैकी गंभीर असलेल्या एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृताचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम शेंद्रे (वय ६०) असे आहे..साकोली तालुक्यातील उसगाव येथील मजुरवर्ग तिरोडा तालुक्यात रस्ता डांबरीकरणाच्या करण्याकरीता पिकअपने (क्र. एमएच ३६ एए ३१२८) जात होतेे. पालाेरावरून करडीकडे येत असताना भरधाव वेगातील पिकअप चालकाचे वाहनावरीलनियंत्रण सुटल्याने पिकअपने पलटी मारली. .यात पिकअपमधून जात असलेले १६ जण गंभीर झाले. अपघात झाल्याची माहिती मिळताच जवळील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी वाहनातील सर्व जखमींना उपचाराकरिता करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. .तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यापैकी दाेघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तुमसर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान ज्ञानेश्वर तुकाराम शेंद्रे (वय ६०) यांचा मृत्यू झाला तर, राकेश आंबेडहारे यांना भंडारा येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे..अपघाताची माहिती मिळताच येथील सरपंच निलीमा इलमे व माजी सरपंच महेंद्र शेंडे मदतीला धावून आले. नागरिकांच्या मदतीने जखमींना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यासाठी मोठी धावपळ केली. या घटनेची माहिती करडी पोलिसांना देण्यात आली. .ठाणेदार विलास मुंडे यांनी घटनास्थळी जाऊन गंभीर जखमीला पोलिस वाहनाने तुमसर येथे हलविले. पिकअप चालक रंजित केसर रामटेके (वय ४०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहन पोलिस ठाण्यात जमा केले आहे . पोलिसांनी चालकवर गुन्हा दाखल केला आहे..हे आहेत अपघातातील जखमीकरडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल्या जखमींमध्ये सुरेश फत्तू गजभिये (वय २८), कैलास लक्ष्मण शेंद्रे (वय ३२), हिरालाल हनू भानारकर (वय ४५) , नरेंद्र किसन धुर्वे (वय ४२), राजकुमार नारायण बावनथडे (वय ४२), राकेश ज्ञानेश्वर आकरे (वय ४०), मुकेश दुधराम रामटेके (वय २८),शेखर पांडू नेवारे (वय ३२),प्रमोद रामा नागोसे (वय ३५), धनराज जैराम बावनथडे (वय ३५), भीमराव जैराम बावनथडे (वय ४०), रामेश्वर सुधारक नेवारे (वय २६), विजय राजीराम बावथडे (वय ४८), विश्वास तुळसिदास रामटेके (वय २७) हे सर्व उसगाव येथील रहिवासी आहेत. करडीचे वैद्यकीय अधिकारी निशा पांडे यांनी जखमींवर उपचार केले. त्यांना प्रथमोपचारानंतर दुपारी तुमसर येथे हलविण्यात आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.