अमरावती : महामार्गावर संत्रातोडीच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारी पिकअप व्हॅन उलटली. या भीषण अपघातात एका महिला मजुराचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झालेत.
गुरुवारी (ता.२७) सकाळी सव्वादहाच्या सुमारास सावर्डी बसथांब्याजवळ ही घटना घडली. जमुना देवानंद सावंत (वय २५, रा. नांदगावपेठ), असे मृत महिला मजुराचे नाव असल्याची माहिती नांदगावपेठ पोलिसांनी दिली. या अपघातात शेख जुबेर शेख इरफान (वय २८), वकार अहमद अमान उल्ला( वय २८),