

Washim News
esakal
कारंजा: तालुक्यातील कामरगाव विद्युत सहाय्यक अभियंता कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पिंपळगाव (बु.) येथे विद्युत व्यवस्थेचा गंभीर बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शेतकरी विद्युत वाहिनीवर आवश्यक असलेला फ्युज नसल्यामुळे केबल थेट मुख्य वीजवाहिनीस जोडण्यात आल्याने ग्रामस्थांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. तसेच येथील रोहित्र उघडे असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.